युट्युब म्हणजे काय ?


युट्युब म्हणजे काय?

नमस्कार मित्रांनो आजच्या या महत्त्वाच्या लेखामध्ये आपण जगातील सर्वात लोकप्रिय असलेले व्हिडिओ शेअरिंग ॲप म्हणजेच युट्युब बद्दल आपण जाणून घेऊया.आज प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन आहेत. आणि ते युट्युब चा वापर सुद्धा करत असतील, असा कुठलाही व्यक्ती सापडणार नाही की जो युट्युब वापरत नसेल कारण युट्युब हे खूप छान व उपयोगाचं ॲप आहे.


जनरली याला आपण वेबसाईट किंवा ॲप या माध्यमातून वापरत असतो या ठिकाणी आपण कुठलेही क्षेत्राच्या संदर्भात आपण स्वतः आपला व्हिडिओ बनवून अपलोड करू शकतो, त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागत नाही. म्हणजेच काय तर युट्युब हे पूर्णतः मोफत आहे.यु ट्यूब वरती अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याकडे जीमेल चे अकाउंट असणे गरजेचे असते.

#what is youtube?

what is youtube
what is youtube युट्युब चा इतिहास


 युट्युब ची सुरुवात हे साधारणपणे 14 फेब्रुवारी 2005 रोजी करण्यात आली होती,  स्टीव्ह चैन, हर्ले  आणि जावेद करीम यातीन जिवलग मित्रांनी मिळून युट्युब ची स्थापना केली सुरुवातीला युट्युब मध्ये सध्या असलेले फीचर्स अस्तित्वात नव्हते, परंतु काळानुसार त्यामध्ये बदल हे करण्यात आले आहे. जेकी  आपल्याला वापरण्यास खूप सोपे झाले आहे.


दिनांक 9 ऑक्टोबर 2006 रोजी गुगलने जवळपास एक अरब 65 करोड डॉलरमध्ये युट्युब विकत घेतले इतक्या मोठ्या रकमेची ही सर्वात मोठी देवाण-घेवाण मानली जात आहे.


युट्युब चे काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य


युट्युब आपल्या नोंदणी कृत सभासदांना पूर्णतः मोफत व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा प्रदान करत असतो. यासाठी ते कुठलेही प्रकारचे चार्ज आपल्याकडून आकारात नाही म्हणजेच ते पूर्णतः मोफत आहे. आपल्याकडे फक्त गुगलची जीमेल अकाउंट असणे गरजेचे आहे.


सध्याच्या स्थितीला यु ट्यूब वरती हजारो आणि लाखो महत्त्वाचे तसेच मनोरंजनाचे व्हिडिओ उपलब्ध आहे. त्यामध्ये प्रामुख्याने संगीत मनोरंजन खेळ क्रीडा शैक्षणिक व्यवसायिक व्यापार यांसारखे महत्त्वाचे क्षेत्रांमध्ये व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी अगदी सहजतेने व मोफत मिळत असतात, याचा आपल्याला शिकण्यासाठी खूप फायदा होत असतो.


जर आपल्याला यु ट्यूब वरती नोंदणी करून अकाउंट बनवायचे नसल्यास तरीसुद्धा आपण त्यावरील व्हिडिओ बघू शकतो, परंतु जर आपल्याला त्यावर ती आपले स्वतःचे तयार केलेले व्हिडिओज अपलोड करायचे असतील तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी अकाउंट क्रिएट करावे लागेल.


युट्युब द्वारे आपण पैसे कमवू शकतो का? 

what is youtube3
Make Money on YouTube 
युट्युब द्वारे आपण मनोरंजनाचा व शैक्षणिक दृष्ट्या उपयोग करू शकतो, त्याचप्रमाणे अति- महत्वाचा उपयोग म्हणजे त्यापासून आपण पैसे सुद्धा कमवू शकतो. हे बर्याच लोकांना माहीत नसते. त्यामुळे युट्युब चा योग्य तो वापर त्यांना त्यांच्या जीवनात करता येत नाही. युट्युब च्या मध्यमातून  आपण हजारो - लाखो पैसे त्याठिकाणी कमवू शकतो, परंतु त्यासाठी संयमाची गरज असते. आणि आपले जे व्हिडिओ असतील ते युजफुल असून शैक्षणिक दृष्टीतून महत्वाचे असले पाहिजे. जेणे करून इतर लोकांना त्याचा फायदा होईल.


या कडे आपण पॅसिव इन्कम म्हणून बघू शकतो, जे सध्याच्या कानात उपयोगात नसून भविष्यात मात्र त्याचे इन्कम खूप महत्वाचे ठरत असते. गुगल च्या सर्व्हीस म्हणजेच (Google Addsense) चा वापर करून आपण पैसे कमवू शकतो.
                                             युट्युब वरून पैसे कमावण्याचे पर्याय


1.      Google Adsense
2.      Sponsored Video
3.      Affiliate Marketing


          तर मित्रांनो आज आपण जाणून घेतलं युट्युब म्हणजे काय? what is youtube? व ते कसे काम करते , त्याचा योग्य तो उपयोग आपण कसा करून घेऊ शकतो. तसेच कंप्यूटर,मोबाईल, इंटरनेट, या संबंधी आम्ही माहिती घेऊन तोच असतो तुम्हाला जर ही माहिती आवडली, तर आपल्या नातेवाईकांमध्ये व मित्रपरिवार मध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना या गोष्टींचा लाभ घेता येईल.
 धन्यवाद

Previous
Next Post »