डीजीलॉकर म्हणजे काय?
नमस्कार मित्रांनो आज आपण एका खास आणि उपयोगाच्या ॲप्लिकेशन बदल जाणून
घेणार आहोत, जे की आपल्यासाठी खूप उपयोगाचे असून ते तितकेच महत्वाचे आहे.यामध्ये
आपण प्रामुख्याने जाणून घेणार आहोत, की डीजीलॉकर
म्हणेजे काय?, डीजीलॉकर चा उपयोग, डीजीलॉकर
चे महत्व आणि ते आपल्या मोबिल मध्ये कसे इन्स्टॉल करावे वापरावे.
1.
डीजीलॉकर म्हणेजे काय?
2.
डीजीलॉकर चा उपयोग
3.
डीजीलॉकर चे महत्व
4. डीजीलॉकर ॲप्लिकेशन कसे इन्स्टॉल करावे
# What is Digilocker?
मित्रांनो डीजीलॉकर हे एक अँड्रॉइड ॲप्लिकेशन असून
त्याची वेबसाईट सुद्धा आहे. जे पूर्णतः सरकारच्या नियंत्रणात खाली आहे. त्यावरती पूर्णतः
कंट्रोल हे सरकारचे आहे. म्हणजेच तुम्ही समजू शकता की हे ॲप्लिकेशन / वेबसाईट पूर्णतः
सिक्युअर आहे. डिजिटल इंडिया याकडे सध्या जास्त लोकांचा कल दिसून येत आहे. आणि म्हणून
सरकारने जनतेच्या हितासाठी त्यांचे महत्वाचे डॉक्युमेंट्स / कागदपत्रे
सुरक्षित ठेवण्यासाठी एका ऑनलाइन
ॲप्लिकेशन माध्यमातून प्लॅटफॉर्म
तयार केला आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने आपण आपली महत्त्वाचे डॉक्युमेंट
जसे शैक्षणिक, व पॅन कार्ड, आधार कार्ड,
ड्रायव्हिंग लायसन, रेशन कार्ड, यांसारखे अतिमहत्वाचे कागदपत्रे
आपण या एप्लीकेशन मध्ये स्टोअर करू शकतो.
डीजीलॉकर चा उपयोग
![]() |
Digilocakr uses |
आपण बऱ्याच वेळा गाडी चालवताना ड्रायव्हिंग लायसन
किंवा गाडीची कागदपत्र सोबत नाहीत म्हणून बऱ्याचदा आपल्या वर दंड भरण्याची वेळ येते मात्र यापुढे त्याची आवश्यकता भासणार नाही. गाडी
चालवत असताना वाहतूक पोलिसांनी पकडलं तर त्यांचा पहिला प्रश्न असतो,
लायसन कुठे आहे? ते असेल तर गाडीचं आरसी, टीसी दाखवा.आणि यातलं काही जरी नसलं
की काही का प्रमाणात होयेना ,पण नाईलाजाने दंड हा आपल्याला भरावाच
लागतो.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी
असो, वो बेरोजगार तरुण हे ज्या वेडेस Online Exam चे फोर्म भारायला जातात तेव्हा
कोणते न कोणते कागदपत्रे विसरून जातात, त्यामुळे डीजीलॉकर चा उपयोग किती महत्वाचा ठरतो हे यावरून
ठरते.
डीजीलॉकर चे महत्व
आजच्या एकविसाव्या शतकामध्ये आपण
सर्व डिजिटल होण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याकडे आपले वाटचालही
सुरू आहेत, त्याचबरोबर आपण जे व्यवहार करत असतो तेसुद्धा आता
ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच डिजिटल माध्यमातून होत आहे. त्याच प्रमाणे
आपण आपले जे डॉक्यूमेंट असतील तेसुद्धा आपण डिजिटल माध्यमांचा वापर करून सुरक्षित ठेवू शकतो, जेणेकरून आपले डॉक्युमेंट हरणार नाही, कुठल्या प्रकारे फाटणार नाही, किंवा त्यावर ती कुठलयही प्रकारे डाग पडणार
नाही, आणि ते पाण्यात सुद्धा भिजणार नाही. म्हणजे त्याचा किती उपयोग होऊ शकतो, हे आपल्याला याठिकाणी समजून
येत असते.
आपल्याला ज्यावेळेस कागदपत्रांची काम असेल त्यावेळेस
आपण केव्हाही, कुठे,त्याचा वापर करू शकतो. त्यामुळे
आपल्याला सर्व कागदपत्रे सोबत बाळगण्याची काहीही गरज नाही. अजून आपला एक फायदा
असा होतो की, कुठलेही कागदपत्र आपल्या कडून घाई-
गरबडीत/ हरवले जाऊ शकते, म्हणून या ॲप्लिकेशन चा वापर करणे
किती महत्वाचे ठरते हे आपण समजू शकता.
डीजीलॉकर ॲप्लिकेशन कसे इन्स्टॉल करावे
चला तर मग आपण जाणून घेऊया
या महत्त्वाच्या एप्लीकेशन ला आपल्या मोबाईल मध्ये आपण कशाप्रकारे
इन्स्टॉल करू शकतो खाली दिलेल्या स्टेप फॉलो
करा.
![]() |
Install Digilocker |
1. सर्वप्रथम
आपल्या मोबाईलच्या ब्राउझर मध्ये जाऊन गूगल वरती प्ले स्टोअर सर्च करावे. प्लेस्टोअर
मध्ये गेल्यानंतर आपल्या सर्च बॉक्समध्ये Digilocakr असे सर्च करावे लागेल.
2. सर्च केल्यानंतर समोर आपल्याला एक ॲप्लिकेशन ओपन
झालेले दिसणार, समोर दिसत असलेल्या install या बटणावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर काही वेळात ॲप्लिकेशन इन्स्टॉल होणार.
3. ॲप्लिकेशन
इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला Open करावे व त्या मध्ये रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करून
विचारण्यात येणाऱ्या माहितीचे योग्य माहिती
देऊन आपल्या मोबाईल नंबरद्वारा रजिस्टेशन प्रक्रिया पूर्ण करावी.
तर मित्रांनो आज आपण जाणून घेतलं डीजीलॉकर म्हणेजे काय? (What is Digilocker) डीजीलॉकर चा उपयोग, डीजीलॉकर चे महत्व आणि ते आपल्या मोबिल मध्ये कसे इन्स्टॉल करावे वापरावे. असेच कंप्यूटर,मोबाईल, इंटरनेट, या संबंधी आम्ही माहिती घेऊन येत असतो. तुम्हाला जर ही माहिती आवडली, तर आपल्या नातेवाईकांमध्ये व मित्रपरिवार मध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना या गोष्टींचा लाभ घेता येईल.
धन्यवाद