आपल्या मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे ?


 आपल्या मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे ?

सध्याच्या एकविसाव्या शतकामध्ये प्रत्येका जवळ आपल्याला मोबाईल बघावयास मिळत असतो, कारण सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून तंत्रज्ञानाचा खूप मोठा उपयोग होत आहे. अशा या काळामध्ये मोबाईल फोन यांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. मात्र या अत्यंत उपयोगाचा साधनाचे काळजी घेणे हे तितकीच महत्त्वाची ठरत असते ,आज काल आपल्याला मोबाईलच्या बॅटरीची सर्वात जास्त समस्या बघायला मिळतात.


#How to extend the battery life of your mobile?

How to extend the battery life of your mobile
Mobile Battery life 


ज्यावेळेस मोबाईल नवीन असतो त्यावेळेस आपल्या मोबाईलची बॅटरी ही योग्य त्या पद्धतीने  काम करत असते, परंतु काही काळानंतर किंवा दिवसानंतर बॅटरीचे काम करण्याची क्षमता ही काही प्रमाणात खालावते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या मोबाईलचा बॅटरी बॅकअप  हा खूप कमी झालेला दिसतो. त्याचे काही महत्त्वाचे कारणे आहेत, ते आपण समजून घेऊया.


1.      मोबाईलची बॅटरी लवकर उतरणे
2.      बॅटरीचे आयुष्य हे खूप कमी  होणे
3.      बॅटरी लवकर चार्जिंग न होणे
4.     कोणतेही एप्लीकेशन वापरत नसताना बॅटरी लवकर डाऊन होणे
5.     मोबाईलच्या बॅटरी ची योग्य काळजी न घेणे


 आज आपण या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण टिप्स बघणार आहोत जेणेकरून आपण आपल्या मोबाईलची बॅटरी व मोबाईलचे आयुष्य काही प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न करूया.1.    बॅटरी चार्ज करण्यासाठी काही नियमांचे पालन करावे

आपल्या मोबाईलची बॅटरी ही कधीही 100% चार्ज करू नका. त्यामुळे आपल्या मोबाईलचा बॅटरीचे आयुष्य कमी होते त्यामुळे नेहमी आपल्या मोबाईलची बॅटरी 90 ते 95% पर्यंत चार्ज करावी.


2.   आपल्या मोबाईलचा डिस्प्ले चे ब्राईटनेस कमी ठेवावे

आपण सर्वजण आपल्या मोबाईलचा ब्राईटनेस खूप जास्त प्रमाणात करून ठेवतो त्यामुळे आपल्या मोबाईलची बॅटरी ही वेगाने संपलेली दिसते.


3.   जास्त बॅटरी खाणारे एप्लीकेशन डिलीट करा


 बरेचदा आपण विचार करतो  की मी तर मोबाईल वापरत नाही, परंतु माझ्या मोबाईलची चार्जिंग ही खूप लवकर संपते त्याचे अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल असलेले एप्लीकेशन जेखूप बॅटरी खर्च करत असतात. आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल असलेल्या ॲप पैकी जे ॲप जास्त चार्जिंग/ बॅटरी खात असतील, त्यांना आपण ताबडतोब आपल्या मोबाईल मधून डिलीट करावे जेणेकरून आपल्या मोबाईलचा बॅटरी बॅकअप आपल्याला चांगला मिळेल.

दुसऱ्यांच्या मोबाईल चे चार्जर वापरायची की नाही
मोबाईल चार्जर 

4.   दुसऱ्यांच्या मोबाईल चे चार्जर वापरायची की नाही ?

जनरली आपल्याकडे असे समजले जाते की एका मोबाईल चे चार्जर दुसऱ्या मोबाईल ला लावल्यास बॅटरी च्या समस्या उद्भवतात परंतु हा आपला गैरसमज आहे. दुसऱ्याची चार्जर वापरत असताना आपल्याला काही काळजी घ्यावी लागते आणि ती म्हणजे आपल्या चार्जरची आउटपुट होल्टेज किती आहे ते शोधावे लागेल. कारण आपल्या फोनची सर्किट तेवढेच होल्टेज घेईल एवढी त्याची क्षमता असणार या पेक्षा जास्त होल्टेज असेल तर मात्र आपला मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य ही कमी झालेले आपल्याला दिसणार.


5.   मोबाईलच्या बॅटरी ची घ्यावयाची काळजी काय करावेकाय करू नये ?


 हे करा

Ø आपल्या मोबाइल  95% चार्ज करा.
Ø  जास्त बॅटरी खाणारे ॲप इन्स्टॉल करू नये किंवा इन्स्टॉल असल्यास ते डिलीट करावे.
Ø आपल्या मोबाईल चार्जर ची जेवढी क्षमता असेल तेवढ्याच क्षमतेच्या दुसऱ्या चार्जर वापराव.
Ø मोबाईलचा योग्य तो व लिमिटेड वापर करावा.

 हे करू नका

Ø आपल्या मोबाईल ला संपूर्ण 100%  पर्यंत कधीही चार्ज करू नका.
Ø  जास्त बॅटरी खाणारे एप्लीकेशन गरज नसताना इन्स्टॉल करू नका
Ø  क्षमतेपेक्षा जास्त मोबाईलचा वापर करू नका.
Ø कोणतेही चार्जर वापरण्या अगोदर त्याच्या आउटपुट होल्टेज आपल्या चार्जर च्या होल्टेज शी जुळता असावा  नसल्यास ते वापरू नका.आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा आमचा लेख आवडला असेल, आम्ही केलेला हा एक छोटासा प्रयत्न  तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असू शकतो, त्यामुळे तुमच्या मित्र परिवारामध्ये आणि आपल्या नातेवाईकांमध्ये हा लेख पाठवा  जेणेकरून त्यांना त्यांच्या या माहितीचा वापर आपल्या जीवनात करता येईल.

धन्यवाद

Previous
Next Post »