· संगणक किवा लॅपटॉपचा स्पीड कसा वाढवावा ?
रोजच्या आपल्या या जीवनातील अतिआवाश्क घटक म्हणजे संगणक,या
मात्वाच्या उपकरणाचा वापर करून आज मानव उतुंग शिखर गाठत आहे. आणि आपल्या जीवनाला
जास्तीत जास्त सुखकर बनवत आहे. पण अश्या या अती आवश्क घटकाचा काम करण्याचा स्पीड / वेग जर कमी झाला तर? आपल्या जीवनावरती काय परिणाम होईल हे आपणास चांगले माहीतच आहे.
म्हणून आपण या यंत्राची योग्य ती काळजी
घेणे गरजेचे असते.
#How to speed up a computer or laptop
बऱ्याच दिवसांनी आपल्या संगणकाचा वेग हा कमी
झालेला जाणवतो त्या वेळस आपण खूप त्रासदायक स्थीतीत असतो.पण तुम्ही काळजी करण्याजी
गरज नाही कारण आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत ,ज्याचा वापर करून
तुम्ही तुमच्या संगणकाचा स्पीड /वेग वाढू शकतात.
संगणकाचा वेग कमी होण्या मागे कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत.ते आपण जाणून घेऊया ....
1) इंटरनेट
स्पीड
2) अनावशक
फाईल्स
3) प्रमाणापेक्षा
जास्त माहिती साठवणे
4) Anti-Virus Install
नसणे..
असे बरेच कारण असू शकतात कि
ज्याने आपल्या संगणकाचा वेग हा कमी झालेला दिसतो. चला तर मग आज आपण काहीतरी
नवीन शिकू या आणि आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉप चा स्पीड हा काही प्रमाणात
वाढवूया.
· STARTUP प्रोग्राम डिसेबल करने
ज्या-ज्यावेळेस आपण संगणक किंवा
लॅपटॉप चालू करतो त्यावेळी आपले संगणक चालू होत असताना बॅकग्राउंडला मध्ये खूप
सारे अप्लिकेशन /सॉफ्टवेअर सुरू होत असतात. त्याचा परिणाम असा होतो की आपल्या संगणक किंवा
लॅपटॉप सुरू होत असताना खूप वेळ लागतो
त्याचा आपला कामावरती आणि आपल्या मनसेकतेवर सुद्धा परिणाम होतो.
Startup प्रोग्राम डिसेबल करण्यासाठी काही सेटिंग
अ.क्र.
|
Startup प्रोग्राम डिसेबल करण्यासाठी खालील पर्यायाचा
अवलंब करावा.
|
1
|
कीबोर्ड
वरील Ctrl + alt +Delete हे बटन दाबावे .
|
2
|
आता
समोर दिसत असलेल्या Task Manager या पर्यायावर क्लिक करावे
|
3
|
समोर दिसत असलेल्या विंडो मधील 4 नबर चा पर्याय Startup या
पर्यायावर क्लिक करा
|
4
|
आता
आपल्यासमोर खूप सारे पर्याय दिसत असतील, त्या मधील आपल्याला जे प्रोग्राम हवे
आहेत तेच फक्त Enabled राहू द्यावे. इतर सर्व अनावश्यक प्रोग्राम Diseble करावे .
|
· योग्य सिस्टीम फॉरवर्ड परफॉर्मन्स निवडणे
आता आपण एक खूप महत्वाची अशी सेटिंग
करणार आहोत ज्यामुळे आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप चा स्पीड हा दुगणित होणार आहे.
याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे.
अ.क्र.
|
योग्य सिस्टीम फॉरवर्ड परफॉर्मन्स निवडण्या साठी खालील पर्यायाचा
अवलंब करावा.
|
1
|
आपल्या संगणकाच्या Control Panel या मध्ये जावे .
|
2
|
आता
समोर दिसत असलेल्या System या पर्यायावर क्लिक करावे
|
3
|
आता Advanced System Setting
या पर्याया मध्ये जाऊन Setting वरती क्लिक करावे
|
4
|
आता Adjust for
best performance या पर्यायावर क्लिक करावे .
|
मित्रानो हे सेटिंग केल्यानंतर आपल्याला
जाणवेल की आपल्या संगणकाचा / लॅपटॉपचा वेग हा दुगुनीत झालेला आहे . जर अजूनही
आपल्या संगणकाचा / लॅपटॉपचा वेग हा वाढला नसेल तर आपण आपले संगणकाला एकदा Restart
करावा.
· टेम्प फाईल डिलीट करने
अ.क्र.
|
टेम्प फाईल डिलीट करण्या साठी खालील पर्यायाचा
अवलंब करावा.
|
1
|
कीबोर्ड
वरील एकाच वेळेस Window + R हे
बटन दाबावे.
|
2
|
आता
समोर दिसत असलेल्या सर्च बर मध्ये temp
किवा %temp% असे टाईप करावे आणि Enter हे बटन दाबावे. आता
आपल्या समोर खूप फाईल / फोल्डर दिसतील
|
3
|
या सर्व फाईल /फोल्डर Ctrl + A हे बटन दाबून डीलीट
करून टाकावे.
|
4
|
आता
Recycle Bin मध्ये जाऊन ह्या सर्व फाईल
डीलीट करा .
|
आता आपल्या संगणकाचा वेग हा काही
प्रमाणात वाढलेला जाणवेल, असेच दोन-तीन
आठवड्यातून ह्या फाईल डिलीट करा. त्याने
आपल्या कम्प्युटरमध्ये अनावश्यक फाईल राहणार नाही आणि आता कॉम्प्युटर वरती लोड येणार नाही मग साहजिकच आपल्या संगणकाचा वेग हा वाढेल.
आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा आमचा
लेख आवडला असेल, आम्ही केलेला हा एक छोटासा प्रयत्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असू शकतो, त्यामुळे
तुमच्या मित्र परिवारामध्ये आणि आपल्या नातेवाईकांमध्ये हा लेख पाठवा जेणेकरून त्यांना त्यांच्या कम्प्युटरचा स्पीड योग्य
त्या रीतीने मेंटेन करता येईल.